हार्ट अॅटॅकपासून वाचायचं आहे, जोडीदाराचं ऐका!

जर आपण हृदयविकारापासून वाचू इच्छिता तर आपल्याला आपल्या पत्नीचं म्हणणं ऐकावं लागेल. एका संशोधनात हे सत्य पुढं आलंय की जोडीदारासोबत सकारात्मक संभाषण केल्यानं हृदयविकाराचं संकट कमी होतं.

Updated: Jul 6, 2014, 08:46 PM IST
हार्ट अॅटॅकपासून वाचायचं आहे, जोडीदाराचं ऐका! title=
प्रातिनिधिक फोटो

न्यूयॉर्क : जर आपण हृदयविकारापासून वाचू इच्छिता तर आपल्याला आपल्या पत्नीचं म्हणणं ऐकावं लागेल. एका संशोधनात हे सत्य पुढं आलंय की जोडीदारासोबत सकारात्मक संभाषण केल्यानं हृदयविकाराचं संकट कमी होतं.

कॅलिफोर्नियाचे वीए ग्रेटर लॉस एंजिलिस हेल्थकेअर सिस्टिमचे नटारिया जोसेफनं म्हटलं, जोडीदारासोबत नकारात्मक संवाद गळ्याच्या नसांमधील गळ्यातून मेंदूपर्यंत रक्त प्रवाह करणाऱ्या नसांना जास्त जाडं करतो. मोठी जाड झालेली नस हृदयाशी निगडित समस्यांना कारणीभूत आहे. 

अभ्यासामध्ये हे माहिती झालं की जे लोक आपल्या जोडीदारासोबत खूप कमी वेळ बोलतात. त्यांच्यात हार्ट अॅटॅकचं प्रमाण 8.5 टक्क्यांनी वाढतं. यासाठी त्यांनी आपल्या जोडीदारासोबत राहणाऱ्या 281 जणांचा अभ्यास केला.  

संशोधकांच्या मते जोडीदारासोबत संवाद भावनिक, आरोग्य आणि शरीर विज्ञान यांचा खूप खोल असा संबंध आहे. त्याचा मुख्य परिणाम हा व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. लाइव्ह सायंसच्या रिपोर्टनुसार जोसेफ यांनी सांगितलं, “संशोधनात जोडीदारासोबत संवाद साधणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यावरील प्रभाव पाहिला, मात्र संवाद आणि ग्रीवा नस यांच्यातील संबंध आणि प्रभाव याचा अभ्यास करता आला नाही.”

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.