कढी पत्ता अनेक व्याथींवर उपाय

कढी पत्ता एक हर्बल औषध आहे, कढी पत्त्याची खासियत आहे की, कढी पत्ता पोटाच्या सर्व आजारांवर नियंत्रण करतो. कढी पत्ता भारतात, खासकरून दक्षिण भारतात जेवणात वापरला जातो. 

Updated: Mar 24, 2016, 07:37 PM IST
कढी पत्ता अनेक व्याथींवर उपाय title=

मुंबई : कढी पत्ता एक हर्बल औषध आहे, कढी पत्त्याची खासियत आहे की, कढी पत्ता पोटाच्या सर्व आजारांवर नियंत्रण करतो. कढी पत्ता भारतात, खासकरून दक्षिण भारतात जेवणात वापरला जातो. 

तडका देण्यासाठी कढी पत्त्याचा वापर होतो, अनेक लोक कढी पत्ता खाताना फेकून देतात, पण असं न केल्यास, कढी पत्ता खाल्ल्यास पोटाच्या आजारांपासून त्यांना आराम मिळू शकतो.

जर वजन वाढत असेल, याची तुम्हाला चिंता असेल, तर दररोज कढी पत्त्याचं पान चावून खा, काही दिवसानंतर तुमचं वजन कमी होण्यास सुरूवात होईल. कढी पत्त्याच्या मुळातही औषधी गुण आहेत. 

कढी पत्ता किडनीच्या रोगासाठी लाभदायक आहे. जर तुमचे केस कळत असतील तर कढी पत्ता खा, यामुळे केस गळणं थांबेल आणि केस सफेद होणार नाहीत.

डायबेटीसवर नियंत्रण आणण्यासाठी सकाळी सकाळी कढी पत्त्याची पानं चावून खा, तीन महिन्यानंतर मोठा फरक दिसेल.