जाणून घ्या, या फूड्सने सेक्स लाइफ बनवू शकतात चांगली आणि मजेदार

 मनुष्याच्या जीवनात सर्वात मोठ्या सुखांमध्ये यौन सुखाचे महत्त्वाचे स्थान आहे. ज्या पद्धतीने शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी चांगल्या भोजनाची आवश्यकता असते, तसेच सुखी दाम्पत्य जीवनासाठी चांकली सेक्सुअल लाइफ असणे आवश्यक आहे. 

Updated: Oct 26, 2015, 06:00 PM IST
जाणून घ्या, या फूड्सने सेक्स लाइफ बनवू शकतात चांगली आणि मजेदार title=

मुंबई :  मनुष्याच्या जीवनात सर्वात मोठ्या सुखांमध्ये यौन सुखाचे महत्त्वाचे स्थान आहे. ज्या पद्धतीने शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी चांगल्या भोजनाची आवश्यकता असते, तसेच सुखी दाम्पत्य जीवनासाठी चांकली सेक्सुअल लाइफ असणे आवश्यक आहे. 

चांगल्या प्रकारच्या भोजनाने सेक्स लाइफ आणखी चांगली होऊ शकते. खासकरून पुरूष जे इरेक्‍टाइल डिस्‍फंक्‍शन शिकार आहेत. त्यांनी आपल्या खानपानाच्या सवयींमध्ये सुधारणा केली तर सेक्स लाइफ खूप चांगली होऊ शकते. काही खान-पानच्या सवयी बदलल्या तर त्याने सेक्स स्टामिना आणि इरेक्शन डिस्फंक्शनची समस्या दूर होईल.

बीट :  बीट खाल्याने स्फूर्ती निर्माण होते. बीटमध्ये नायट्रिक ऑक्साइड असते, ते खाल्ल्याने रक्त वाहिन्या फुगतात. त्याने जनांगांकडे रक्ताचा पुरवठा होतो. व्यक्तीला स्फूर्ती येते. बीटमध्ये बॉरॉनची मात्रा अधिक असते. बॉरॉन सेक्स हार्मोन वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. पुरूषांमध्ये इरेक्‍टाइल डिस्‍फंक्‍शनची समस्या असल्यास बीटच्या सेवन महत्त्वाचे असते. यात सेक्स स्टेमिनात वाढ होऊ शकते. 

पालेभाज्या :  पालेभाज्यांमध्ये नायट्रेडचे प्रमाण अधिक असते. पालक, मेथी, ओवाच्या सेवनाने रक्ताभिरण वाढते. तसेच लिंगाच्या उत्तेजना वाढण्यात मदत होते. एमिनो अॅसीड आणि फोलेटचे प्रमाण पालकमध्ये अधिक असल्याने बेड़रूमध्ये जास्त काळ परफॉर्मन्स देण्यात वाढ होते. जननांगांच्या ब्लड सर्कुलेशन वाढविण्यात पालकची मोठी भूमिका असते. 

टरबूज :  टरबूज खाल्ल्याने सेक्स ड्राइव्ह वाढतो. वैज्ञानिकांनी सांगितल्यानुसार सेक्स ड्राइव्ह वाढण्यासाठी टरबूज हे व्हायग्राचे काम करते. टरबूजमध्ये सेक्स ड्राइव्ह वाढविण्याचे सर्व गूण आहेत. संशोधनात समोर आले की, टरबूजमध्ये आढळणारे तत्व शरीरात ब्लड वेसल्सवर व्हायग्रासारखे परिणाम करतात आणि सेक्स ड्राइव्हला वाढतो. टरबूजमध्ये पायथो-न्यूट्रिअंट्स असतात. 

ओट्स : उत्तेजनात कमतरता आणि नपुंसकता समस्येवर वाइल्ड ओट्सचे सेवन चांगला उपाय आहे. यात अरजीनीन मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्तातील टेस्टोस्टेरॉनला सक्रीय करण्यात मदत करते. त्यामुळे सेक्स लाइफ चांगली होती. 

डार्क चॉकलेट : यातील कोकोआ मधील मोठ्या प्रमाणात फ्लेवेनाइड्स आणि एंटीआक्सिडेंट असतात. यामुळे रक्ताभिसरण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे लिंग उत्तेजनेत मदत होते तसेच सेक्स लाइफ चांगली होते. 

पिस्ता :  पिस्त्यात पोटेशियम हे पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असते. दररोज पिस्ता खाल्याने यौन इच्छा वाढते. यातील अरजीनीनमुळे मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि यौन उत्तेजना वाढते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.