टक्कल पडलंय, घाबरू नका... आता टकलावरही उगवणार केस, संशोधकांनी शोधलं औषध

जर आपल्या डोक्यावर केस नसतील आपलं टक्कल पडलं असेल तर आता घाबरण्याची काळजी नाही. आता डोक्यावर सहज केस उगवतील, असं औषध कोलंबियाच्या संशोधकांनी शोधून काढलंय. 

Updated: Oct 26, 2015, 01:31 PM IST
टक्कल पडलंय, घाबरू नका... आता टकलावरही उगवणार केस, संशोधकांनी शोधलं औषध     title=

न्यूयॉर्क: जर आपल्या डोक्यावर केस नसतील आपलं टक्कल पडलं असेल तर आता घाबरण्याची काळजी नाही. आता डोक्यावर सहज केस उगवतील, असं औषध कोलंबियाच्या संशोधकांनी शोधून काढलंय. 

उंदरांवर या औषधाची चाचणी यशस्वी झालीय. या प्रक्रियेत केवळ ५ दिवसांची ट्रिटमेंट घेतल्यानंतर १० दिवसांत केसांची वाढ सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार कोलंबिया विद्यापीठाच्या मेडिकल सेंटरमध्ये वैज्ञानिकांनी एक असं औषध शोधलंय. ज्यामुळं टक्कल पडलेल्यांच्या डोक्यावरही केस उगवतील. याबाबत बोलतांना संशोधक डॉक्टर एंजेला एम क्रिस्टियानो यांनी सांगितलं, 'या औषधाचा शोध लावण्यासाठी त्यांनी उंदरांचा वापर केला. उंदरावर यशस्वी चाचणीमुळे हे स्पष्ट झालंय की, आता मनुष्यावर पण हे यशस्वी होईल. यासाठी दोन उंदरांवर औषधाचा प्रयोग केला गेला. औषध अशा ठिकाणी वापरलं जिथं कधीच केस उगवले नाहीत. यात एका उंदराचे केस होते आणि एकाचे केस नव्हते. यानंतर जवळपास ३ आठवड्यांनंतर उंदरांमधील बदल दिसून आला.'

आणखी वाचा - ६ खास टिप्स: दाट, मऊ आणि चमकदार केसांसाठी

क्रिस्टियानो यांचं म्हणणं आहे की, हे औषध केसांच्या वाढीस मदत करतं. तीन आठवड्यानंतर ज्या उंदरावर याचा प्रयोग केला गेला त्याचं परिक्षण केलं. तेव्हा त्याचे केस पूर्णपणे उगवलेले होते. 

संशोधकांच्या मते आता हे स्पष्ट झालंय की, कोणत्याही अडचणीशिवाय या औषधांमुळे केस नसणाऱ्यांना याचा फायदा होईल, केस उगवतील. ५ दिवस हे औषध लावल्यानं १० दिवसांनंतर केसांची वाढ सुरू होईल. 

आणखी वाचा -  केसगळतीवर हीना-मोहरी तेलाचं मिश्रण रामबाण उपाय

(With PTI Inputs)

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.