लंडन : जेवण जेवताना नेहमी सावकाश जेवावे कारण हळू जेवल्याने समाधान मिळते, तसेच पोटाला हवे तेवढेचं अन्न पोटात जाते.
सावकाश जेवण करणाऱ्या लोकांचे बॉडी मास इंडेक्स हे पटापट जेवण करणाऱ्या लोकांपेक्षा कमी असते, पण या मागचे कारण अजूनही समजू शकले नाही, असे एका अभ्यासातून समजते.
हा अभ्यास करण्यासाठी ब्रिस्टल विद्यापीठाच्या शोधकर्त्यांनी काही स्वयंसेवकांना नळीच्या साहाय्याने दोन भिन्न गतीने ४०० मिलीमीटर टॉमेटो सूप पाजले.
पहिल्या गतीत ११.८ मिलीमीटर सूप प्रत्येकी दोन सेकंदानंतर पाजून नंतर चार सेकंदांचा आराम दिला गेला. दुसऱ्या गतीत ५.४ मिलीमीटर सूप एका सेकंदात पाजून त्यानंतर दहा सेकंदाचा आराम दिला गेला.
त्याना सूप प्यायल्यानंतर लगेचचं दोन तासांनी प्रश्न विचारले गेले कि त्यांना किती समाधान मिळाले. यात सावकाश सूप पिणारे अधिक समाधानी असल्याचे म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.