मुंबई : आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगात खूप वेळ कॉंप्यूटरवर अथवा लॅपटॉपवर काम करून आपले डोळे थकून जातात आणि कोरडे पडतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्याच्या काही सोप्या पद्धती..
१) स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉंम्प्यूटरवर काम केल्याने आपल्या डोळ्यावर बराच ताण पडत असतो. त्यामुळे अशा यंत्रांच्या स्क्रीन उच्च क्वॉलिटीच्या आणि स्वच्छ असाव्यात त्यामुळे डोळ्यावरील तान कमी होऊ शकतो. स्क्रीन जर मोठी असेल तर अधिक उत्तम.
२) काम करते वेळी रूमचे तापमान कमीतकमी असावे. रूममध्ये थोडा ओलावा असावा त्यामुळे डोळे कोरडे राहणार नाहीत. शक्यतो काम करते वेळी रूममध्ये सिगरेट ओढू नये.
३) जास्त पाणी प्यावं. चेहरा आणि डोळे यांच्या स्नायूंना आराम मिळणे गरजेचे आहे. काम करते वेळी काही वेळ डोळ्यांना आराम द्यावा, पाणी प्यावं, खिडकीतून बाहेर पहावं. हिरवळीकडे पाहणे डोळ्यांसाठी चांगले असते.
४) ओलाव्याच्या अभावामुळे डोळ्यांना खाज सुटते. तसेच डोळे लालसर होतात आणि डोळ्याची जळजळ होते. त्यामुळे काम करते वेळी डोळ्याकडे दुर्लक्ष करू नये.
५) काम करते वेळी डोळ्यांना थोडा आराम द्यावा. आपल्या जागेवरून उठून थोड्या चकरा माराव्यात. कामाचा विचार थोडा बाजूला ठेवावा.
६) कॉंन्टॅक्ट लेन्स घालून काम केल्याने डोळ्यांवर दबाव निर्माण होतो. जर तुम्ही कॉंन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर आठवड्यातून एकदा चष्मा वापरावा त्याने डोळ्यांना आराम मिळून डोळ्यावरील ताण कमी होतो.
७) डोळ्यांच्या संबधित कोणती समस्या असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. डोळे कोरडे पडणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यांना खाज सुटणे यांसारख्या साध्या समस्या असतील तरी डॉक्टरांशी संपर्क साधावा.