वजन कमी करण्याचा साधा उपाय

वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, हे फक्त लक्षात ठेऊन अंमलबजावणी केली तर तुम्हाला महिन्याभरात फरक निश्चित लक्षात येईल.

Updated: Dec 10, 2014, 10:50 AM IST
वजन कमी करण्याचा साधा उपाय title=

मुंबई : वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, हे फक्त लक्षात ठेऊन अंमलबजावणी केली तर तुम्हाला महिन्याभरात फरक निश्चित लक्षात येईल.

सुरूवातीला तुमचं वजन किती आहे ते मोजून घ्या, कारण पुढच्या ३० दिवसात काय फरक पडतो हे तुमच्या लक्षात येईल.

१) सर्वात महत्वाचं म्हणजे रात्रीचं जेवण सात-साडेसात पर्यंत करा
२) जेवणानंतर तुम्ही चार तासांनी झोपा, म्हणजे तुमच्या अन्नाचं पूर्ण पचन झालं असेल.
३) सकाळी उठल्यावर सर्वात आधी चूळ भरल्यानंतर ग्लासभर कोमट पाणी प्या
४) तेलकट वस्तू खाण्याचा मोह टाळा. उदा. वडापाव, समोसा
५) रोज सर्व तणाव विसरून १५ मिनिटं तरी बागेत, मैदानात फिरा, यावेळी मोबाईल वापरणं टाळा.

*** हे सर्व करतांना शिस्त पाळा, म्हणजेच नियमितपणे याची अंमलबजावणी करा***

तुम्ही तुमचं जेवण संध्याकाळी सातपर्यंत आटोपलं तर, आणि चार तासानंतर तुम्ही झोपायला गेले, तर तुम्हाला सकाळी निश्चितच लवकर नाश्ता लागेल, म्हणजे तोही वेळेवर होईल.

यानंतर तुमचं दुपारचं जेवण देखिल वेळेवर होईल, सातला जेवायचं असल्याने समोसा, वडापाव सारख्या गोष्टींची संध्याकाळी सहाला खाण्याची तुम्हाला गरज भासणार नाही. आहारात तेलाचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करा.

एवढ्या साध्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या, आणि वेळेवर सर्व काही केलं, अंमलबजावणी केली, तर तुम्हाला ३० दिवसात फरक दिसेल.

एवढं सर्व नियमित करूनही वजन कमी होत नसेल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.