युरेका… अखेर एचआयव्हीवर उपचार सापडला

आतापर्यंत असाध्य मानल्या जाणाऱ्या एड्स या रोगावर उपचार करणं शक्य झालयं. अमेरिकेतील दोन एचआयव्ही पॅझिटिव्ह रुग्ण आता औषध न घेताही निरोगी जीवन जगतायत. या बातमीमुळे अनेक एड्सग्रस्त रुग्णांच्य आशा पल्लवित झाल्या आहेत.

Updated: Jul 4, 2013, 06:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यू यॉर्क
आतापर्यंत असाध्य मानल्या जाणाऱ्या एड्स या रोगावर उपचार करणं शक्य झालयं. अमेरिकेतील दोन एचआयव्ही पॅझिटिव्ह रुग्ण आता औषध न घेताही निरोगी जीवन जगतायत. या बातमीमुळे अनेक एड्सग्रस्त रुग्णांच्य आशा पल्लवित झाल्या आहेत.

हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा शोध लावलाय. अमेरिकेतील दोन एचआयव्ही रुग्ण ‘बोन मॅरो ट्रांन्सप्लांट’वेळी प्रतिरोधक रक्तपेशी मिळाल्यामुळे ‘अँटी रेट्रोवायरल थेरपी’ न घेता स्वस्थ आणि निरोगी जीवन जगतायत, अशी माहिती हॉवर्ड युनिव्हर्सिटीचे संशोधक टिमोथी हेर्निक आणि डेनियल कुरीट्स्टस यांनी दिलीय. हे पाऊल खरंच एड्सच्या उपचाराच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे.
या दोघा रुग्णांना एडस झाल्यामुळे ते एचआयव्हीसाठी औषध घेत होते. त्यानंतर यांना रक्ताचा कॅंन्सर झाला. ज्याचं निदान करण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आलं. ट्रान्सप्लांटच्या वेळी त्यांना ज्या रक्तपेशी मिळाल्या त्यांची प्रतिकारक्षमता प्रचंड होती. या पेशीमुळे रुग्णाची प्रतिकारक्षमता इतकी वाढली की एचआयव्ही वायरसची शक्ती त्याच्यापुढे कमी होत गेली.
स्वस्थ आणि प्रतिरोधक पेशी मिळवून एचआयव्हीवर मात करण्याच्या पद्धतीचा प्रयोग सगळ्यात आधी २००७ मध्ये अमेरिकन नागरिक ‘टिमोथी रे ब्राउन’वर करण्यात आला होता. त्याला एचआयव्हीच्या साथीने ‘ल्युकेमिया’( ब्लड कॅन्सरचा एक प्रकार)झाला होता. त्याला अशा व्यक्तीक़डून रक्ताच्या पेशी मिळाल्या ज्यांची प्रतिकार क्षमता प्रचंड होती.

या प्रकारची पद्धत नक्कीच एचआयव्हीच्या उपचारामध्ये क्रांती आणू शकते, असं डेनियल कुरीट्स्टस यांच मत आहे. अधिक प्रतिकारक्षमता असलेल्य़ा रक्त पेशी नक्कीच एचआयव्हीच्या वायरसला कमकुवत करु शकतात. आता लगेच हे म्हणणं चुकीचं ठरेल की,या पद्धतीने एडस पूर्णपणे बरा होऊ शकतो कारण जशी शरीराची प्रतिकारक्षमता कमी होत जाते तसा एचआयव्हीचा वायरस पुन्हा सक्रिय होतो.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.