मुंबई : तुम्हांला ऐकायला आणि वाचायला विचित्र वाटेल पण ओले मोजे पायात घालून झोपल्यास अनेक आरोग्यसंबंधी फायदे होऊ शकतात. ताप, सर्दी सारख्या अनेक आजारांना ही थेरेपी पळवू शकते.
१) मोठ्या कामाचा आहे ओला मोजा
औषधांनी आजारांचा इलाज होतो पण असे काही घरगुती उपाय तुमचे आजार लवकर बरे करण्यात मदत करतात. घरगुती उपायांचे विशेष म्हणजे याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. असा एक उपाय आहे ओला मोजे पायात घालून झोपणे.... सर्दी, पडसे, ताप आणि पोटचे विकारात याचा उपयोग होऊ शकतो.
२) ताप कमी होतो
तुम्ही तापाने फणफणले असाल आणि औषध घेऊनही काही उपयोग होत नाही. त्यावेळी वेट सॉक्स ट्रीटमेंटचा उपयोग करा. यामुळे ताप कमी होई शकतो. एका बाऊलमध्ये दोन ग्लास पाणी घ्या. त्यात व्हेनेगर टाका. त्यात एक जोडी लोकरीचे मोजे चांगले भिजवून घ्या. त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाकला. रात्रभर हे मोजे घालू झोपा. ४० मिनिटांनंतर शरिराचं तापमान कमी होईल. यामुळे तुमची इम्युनिटी सिस्टिम मजबूत होतो. तुम्हांला आरोग्याचा फायदा होतो.
३) कफ मोकळा करतो
ओले मोजे घालून झोपल्यावर कफ लवकर मोकळा होतो. एका बाऊलमध्ये दोन कप दूध घ्या आणि एक चमचा मध आणि दोन मोठा कांदे कापून त्यात मिक्स करा. या मिश्रणाला १५ मिनिटे सोडून द्या. त्यात एक जोडी लोकरीचे मोजे चांगले भिजवून घ्या. त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाकला. कांदा आणि दूधाच्या अॅन्टीबॅक्टेरियल तसेच एन्टी इफ्लेमेंटरी गुणामुळे कफ हलका होतो. तो सहजपणे बाहेर पडतो.
४) पचन संबंधी समस्या
काळे जीरे, बडीशेप पाण्यात टाकून १५ मिनिटे उकळवा. त्यात एक जोडी लोकरीचे मोजे चांगले भिजवून घ्या. त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाकला. यामुळे तुमच्या पचनाची समस्या अर्ध्या तासात दूर होईल. जीरा आणि बडीशेप रक्त संचार दुरुस्त करते. तसेच पाचनसंबधाची समस्या दूर होते.
५) बद्धकोष्टाची समस्या
ओले मोजे घालून झोपल्यास तुमचे पोट साफ होईल. बद्धकोष्टाची समस्या असलेल्या व्यक्तींनी मोजे घालून त्याला आराम मिळतो. थोडे लोणी, अर्धे सफरचंद, एक चमचा मध आणि एक चमचा आळशी एका बाउलमध्ये टाकून त्यात एक कप पाणी टाका. त्यात एक जोडी लोकरीचे मोजे चांगले भिजवून घ्या. त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाकला. रात्रभर घालून झोपल्यास तुमचे पोट साप होईल.