मुंबई : नव्या वर्षाचं सेलिब्रेशन आहे आणि पार्टीत ड्रिक्स नाही असं होणार नाही. मात्र काही जण पार्टीच्या चक्करमध्ये इतकं ड्रिंक करतात की नव्या वर्षातील पहिल्या दिवसांत त्यांना झोप आवरत नाही. पार्टीचा हँगओव्हर काही दिवसभरात उतरत नाही. हँगओव्हर होत असेल हे आहेत काही उपाय
मोठ्या प्रमाणात हँगओव्हर होत असेल तर दोन ते तीन केळी एकावेळी खावीत. यातील मॅग्नेशियम रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करते. त्यामुळे हँगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी याचा फायदा होतो.
बटाटे खाण्यानेही हँगओव्हरपासून सुटका होण्यास मदत होते. यात पोटॅशिअम हँगओव्हर उतरण्यासाठी फायदेशीर ठरते
ज्या पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते असे पदार्थ डोकेदुखी कमी करण्यास मदत करतात. दह्यात मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असते जे हँगओव्हर दूर करण्यात मदत करते
पार्टीनंतर होणारा हँगओव्हर टाळायचा असेल तर पार्टीला जाण्याआधी तेलकट पदार्थ खाऊन जा. यामुळे शरीरात अल्कोहोल शोषले जात नाही.
हँगओव्हरमुळे होणारी डोकेदुखी रोखायची असेल तर कॉफी प्यावी. मात्र ब्लॅक कॉफी पिणे चांगले.
शरीरातील टॉक्सिफिकेशनसाठी पाणी महत्त्वाचे असते. जास्त अल्कोहोल घेतल्याने शरीरात पाण्याची कमतरता होते. त्यामुळे ड्रिंकसोबत आणि ड्रिंकनंतर भरपूर पाणी प्या.
लिंबू, साखर आणि मिठ एकत्रित करुन घेतल्यास हँगओव्हर उतरण्यात मदत होते.
हँगओव्हर दूर करण्यासाठी नारळपाणी पिणे फायदेशीर ठरते. यातील मिनरल्स पोट साफ करण्याचे काम करतात.