मुंबई : पाण्याला जीवन मानले जाते. जगण्यासाठी अन्नापेक्षाही अधिक पाण्याची गरज असते. दिवसाला १० ग्लास पाणी प्यायल्याने शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते.
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे चांगले मानतात. मात्र या पाण्यात मीठ टाकल्यास त्याचा परिणाम दुप्पट चांगला होतो.
मीठ टाकून पाणी पिण्याचे हे आहेत फायदे
मिठामध्ये असलेले मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात. मीठाचे पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो.
मीठ टाकून पाणी प्यायल्याने तणावर कमी होण्यास मदत होते. तसेच झोपही चांगली येते.
जेव्हा तुम्ही मीठ टाकलेले पाणी पिता तेव्हा लाळग्रंथी सक्रिय होते याचा परिणाम पचनशक्तीवर होतो. ज्यामुळे पाचनतंत्र सुधारते.
मीठामध्ये सल्फर, झिंक, आयोडिन आणि क्रोमियम सारखे मिनरल्स असतात ज्यामुळे त्वचेची सफाई होते.
शरीरावर कोणत्या भागाला सूज आली असल्यास त्यावरही फायदेशीर आहे मिठाचे पाणी.
तुम्हाला नीट झोप येत नाहीये तर यावर काळे मीठ परिणामकारक ठरते.