मुंबई : हिवाळ्यात वातावरण हे थंड असते त्यामुळे शरिरातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी उष्ण आहार घ्यावा लागतो. हिवाळ्यामध्ये उष्ण पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे.
हिवाळ्यात या पदार्थांचं करावं सेवन :
दुग्धजन्य पदार्थ : दुध, तुप, लोणी यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता आणि कॅलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यात शरिराचं तापमान संतुलीत राखण्यासाठी हे पदार्थ मदतगार ठरतात.
मांसाहार : हिवाळ्यामध्ये मटण, मांस, मासे, अंडी यासारख्या मांसाहाराचा समावेश केला पाहिजे.
मसाले : हिवाळ्यात तीळ, लसूण, मोहरी, लवंग, मिरी, आले, हिंग या पदार्थांच्या मसाल्याचा वापर करावा. मिरी, लसूण आणि तूप घालून चटणी करावी. ताकाला फोडणी देऊन ताक प्यावे. तीळाची चटणी हिवाळ्यात आरोग्यासाठी चांगली असते.
धान्य : गहू, ज्वारी, बाजरी ह्या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. भाकरी बरोबर लोणी किंवा तुप खावे.
डाळ : तूर, उडीद, मटकी, कुळीथ हे कडधान्य हिवाळ्यात अतिशय चांगले असतात.
भाजी : पालेभाज्या, फळभाज्यांचाही हिवाळ्यामध्ये आहारात भरपूर समावेश करावा. फळ खाणेही हिवाळ्यात आरोग्यासाठी चांगले असते.
ड्रायफ्रुट्स : काजू, मणूका, अक्रोड हे उष्ण पदार्थ असल्याने याचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.
हिवळ्यात शक्यतो कोमट पाणी प्यावे. कोमट पाणीमुळे पचन योग्य प्रकारे होते.