पावसाळ्यात केसांच्या समस्या जाणवतायत... हे घ्या पाच सोप्पे उपाय!

पावसाळ्यात केस कोरडे होणं, केसांत कोंडा होणं किंवा केसांची चमक निघून जाणं या समस्या अनेकांना जाणवतात. यावर सोप्पा उपाय तुमच्या घरात आहे...

Updated: Jul 6, 2016, 01:52 PM IST
पावसाळ्यात केसांच्या समस्या जाणवतायत... हे घ्या पाच सोप्पे उपाय! title=

मुंबई : पावसाळ्यात केस कोरडे होणं, केसांत कोंडा होणं किंवा केसांची चमक निघून जाणं या समस्या अनेकांना जाणवतात. यावर सोप्पा उपाय तुमच्या घरात आहे...

हवेत आर्द्रता मोठ्या प्रमाणात असल्यानं पावसाळ्यात ही समस्या खूपच कॉमन आहे. यासाठी हे पाच उपाय करता येतील... 

- उकळलेल्या चहाचं पाणी आणि लिंबू... यामुळे तुमच्या या समस्या तत्काळ दूर होऊ शकतात. यासाठी काही चहाची पाणं सहा-सात कप पाण्यात उकळवून घ्या... हे उकळलेलं पाणी थंड झाल्यानंतर एक लिंबू पिळून घ्या... आणि केस शॅम्पूनं धुतल्यानंतर हे पाणी केसांवरून घ्या.

- केसांना तेल लावल्यामुळेही केसांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. केस धुण्याआधी गरम तेलानं केसांच्या मुळांना चांगली मालिश करून घ्या... केसांत कोंड्याची समस्या जाणवत असेल तर ऑलिव्ह तेल गरम करून हलक्या हातांनी मसाज करा... आणि मग केस धुवून घ्या. 

- पावसाळ्याच्या दिवसांत केस ओले राहिले तर केसांतून घाणेरडा वास येऊ शकतो. हे टाळण्यासाठी आठवड्यातून तीन-चार वेळा तरी केस धुवावेत. केस धुताना जास्त शॅम्पू वापरणं टाळा. 

- केसांची चमक परत मिळवण्यासाठी एक अंड फोडून त्याचा बलक लिंबाच्या रसात मिसळून हे मिश्रण केसांना लावा... आणि तासाभरानंतर केस धुवून टाका.

- आणखी एक उपाय म्हणजे पपईचा गर, बेसन आणि लिंबाचा रस एकत्र करून हा पॅक केसांना लावून घ्या... आणि थोड्यावेळानंतर केस स्वच्छ धुवून घ्या.