मुंबई : धूम्रपानामुळे माणसाच्या शरीराच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचे नव्या अभ्यासातून समोर आलेय.
तसेच धूम्रपानामुळे पुरुषांना वंधत्वाचा धोका असल्याची माहितीही समोर आलीये. ३० ते ५० टक्के पुरुषांमध्ये वंधत्वाचे कारण धूम्रपान असल्याचे समोर आलेय.
ब्राझीलच्या साओ पावलो फेडरल युनिर्व्हसिटीचे वरिष्ठ लेखक आरपी बेर्टोला यांनी दिलेल्या माहितीनुसार, धूम्रपानामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेला नुकसान पोहोचत असल्याचे अभ्यासातून समोर आलेय. संशोधनानुसार, धूम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या शुक्राणूमध्ये बदल झालेले पाहायला मिळाले.