रोज १ टोमॅटो खाल्ल्याने होतात अनेक फायदे

सॅलडमध्ये तसेच भाज्यांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. मात्र तुम्हाला माहीत आहे का रोज टोमॅटो खाण्याचे फायदे. ज्या आजारांवरील इलाज कठीण आहे यावरही टोमॅटो गुणकारी आहे.

Updated: Mar 20, 2016, 09:22 AM IST
रोज १ टोमॅटो खाल्ल्याने होतात अनेक फायदे title=

मुंबई : सॅलडमध्ये तसेच भाज्यांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. मात्र तुम्हाला माहीत आहे का रोज टोमॅटो खाण्याचे फायदे. ज्या आजारांवरील इलाज कठीण आहे यावरही टोमॅटो गुणकारी आहे.

जाणून घ्या टोमॅटो खाण्याचे 10 फायदे

हृद्यासंबंधित रोगांपासून बचाव होतो.

युरिन इन्फेक्शनपासून बचाव तसेच रक्तशुद्धी होते.

पाचनशक्ती वाढवते. पालकाच्या रसात टोमॅटोचा रस मिसळल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. 

टोमॅटोमध्ये असलेल्या व्हिटामिन के मुळे हाडे मजबूत होतात. तसेच बोन टिश्यू रिपेअर होण्यास मदत होते. 

अँटीऑक्सिंडंटचे भरपूर प्रमाण असलेल्या टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी आणि ए असते. व्हिटामिन ए डोळ्यांसाठी तसेच डिहायड्रेशनसाठी चांगले. 

केसांना चमकदार तसेच मजबूच बनवण्यासाठीही टोमॅटो फायदेशीर आहे. 

त्वचेला उजाळा मिळवून देण्यासाठी टोमॅटो खाणे चांगले. 

बिया नसलेल्या टोमॅटोचा सॅलडमध्ये वापर केल्यास किडनी स्टोनची शक्यता कमी होते. 

प्रतिकारक्षमता वाढवते. तसेच तणावापासून दूर रोखण्यासाठीही टोमॅटो लाभदायक आहे. 

स्मोकिंगमुळे शरीराला होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठीही टोमॅटोचे सेवन फायदेशीर ठरते