दोन पेग अल्कोहोल प्या आणि स्मरणशक्ती वाढवा!

वयाची साठावी ओलांडल्यानंतर दररोज दोन पेग दारू प्यायल्याने स्मरण शक्ती वाढते, असं संशोधकांच्या अभ्यासातून समोर आलंय. 

Updated: Oct 24, 2014, 10:52 PM IST
दोन पेग अल्कोहोल प्या आणि स्मरणशक्ती वाढवा! title=

न्यूयॉर्क : वयाची साठावी ओलांडल्यानंतर दररोज दोन पेग दारू प्यायल्याने स्मरण शक्ती वाढते, असं संशोधकांच्या अभ्यासातून समोर आलंय. 

60 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींमध्ये संज्ञानात्मक (डिमेशिया) दोष पीडित नसणाऱ्या लोकांसाठी एका मर्यादेपर्यंत सेवन केल्यामुळे मेंदूमधील हिप्पोकम्पसशी जोडल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. 

अमेरिकेतील ‘यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास’मधील गेलवेस्टॉन मेडिकल ब्रान्चचे ब्रायन डॉनर यांनी म्हणण्यानुसार, वाढत्या वयासोबत जे लोक दारूचे सेवन करतात किंवा स्वस्थ राहण्यासाठी ज्या लोकांनी दारूचे सेवन सोडले आहे अशा लोकांच्या तुलनेत या व्यक्ती जास्त स्वस्थ असतात तसंच त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. 

हा शोध अमेरिकन ‘जर्नल ऑफ अल्जायमर्स डिसीझ अॅन्ड अदर डेमेन्टियास’मध्ये प्रकाशित झाले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.