मुंबई : सेक्स करण्यापूर्वी काही अशा गोष्टी आहेत ज्या खाऊ नये. सेक्स करण्यापूर्वी या गोष्टी खाल्याने त्याचे शरिरावर परिणाम होतात. सेक्स पावर वाढवण्यासाठी अनेक गोष्टी लोक खातात. पण काय खाऊ नये हे बऱ्याच लोकांना माहित नसते.
१. सोयाबिन : सेक्स करण्यापूर्वी सोयाबिन चुकूनही खाऊ नका. कारण सोयाबिन पचायला जड असते. त्यामुळे सेक्सदरम्यान तुम्हाला गॅस होऊ शकतो. सेक्स दरम्यान याचा परिणाम होऊ शकतो.
२. लसून : कांदा, लसूण यांसारखे पदार्थ विर्यवर्धक असतात असे अनेकजण सांगतात. मात्र, असे असले तरी सेक्स करण्यापूर्वी हे पदार्थ कधीच खाऊ नका. हे पदार्थ तोंडाला दुर्गंधी आणतात. अशावेळी तुमच्या जोडीदाराला तुमच्या तोंडाच्या वासामुळे बैचेन वाटू शकते. तसेच, त्याचा सेक्स आणि तुमच्यातलाही आनंद कमी होऊ शकतो.
३. पनीर : पनीर ही अनेकांची आवडती डिश असली तरी पनीरमुळे पोट जड होते. त्यामुळे तुम्हाला हालचाली करतांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सेक्सदरम्यान तुमच्या पार्टनरचा मुड खराब होऊ शकतो.
४. मटन : मटन हे प्रमाणात खाल्ल्यास शरिरासाठी नक्कीच चांगले असते. परंतू सेक्स करण्याआधी ते चुकूनही खाऊ नका. कारण मटन पचायला जड असते आणि पोटात बराच वेळ साचून राहते. त्यामुळे सेक्स दरम्यान याचा त्रास होऊ शकतो.
५. तळलेले पदार्थ : तळलेले पदार्थ तुमच्या शरिरातील रक्त प्रवाहावर परिणाम करतात. त्यामुळे रक्तप्रवाह मंदावून उत्तेजना कमी होते. त्यामुळे तळलेले पदार्थ शक्यतो खाणे टाळा.