मुंबई : पनीर हा असा पदार्थ आहे जो प्रत्येकाला आवडतो. पनीरमध्ये प्रोटीनची मात्रा अधिक असल्याने शरीरासाठी पनीर चांगले. मात्र तुम्हाला माहीत आहे का पनीर खाण्याची योग्य वेळ कोणती आहे. तर घ्या जाणून
१. व्यायामाआधी अथवा व्यायामानंतर पनीर कधीही खाऊ नये.
२. व्यायामानंतर पनीर खाल्ल्यास त्यातील फॅट तुमची पाचनक्रिया संथ करतात.
३. रात्री झोपण्याच्या एक तास आधी पनीर खाऊ शकता.
४. झोपण्याच्या वेळेस शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते. त्यामुळे त्यापूर्वी पनीर खाल्ल्यास प्रोटीन शरीराला मिळते.
५. दिवसा कधीही तुम्ही पनीर खाऊ शकता. मात्र अधिक प्रमाणातही खाऊ नये.
६. पनीरचे सेवन योग्य प्रमाणात केल्यास तुमचे वजनही वाढणार नाही आणि तुम्ही फिट राहाल.