www.24tass.com , झी मीडिया, मुंबई
सुदृढ आणि ताजंतवानं राहणं प्रत्येकालाच आवडतं. मात्र त्यासाठी काय करावं हे समजत नाही, तर मग खास तुमच्यासाठी सुदृढ राहण्यासाठीच्या काही टिप्स...
• आपल्या आहारात व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी जेवणात मेथी, पालक आणि इतर पालेभाज्यांचा समावेश नक्की करा.
• आठवड्यातून २ ते ३ वेळा रताळं खावं. एका मध्यम आकाराच्या रताळं खाल्ल्यानं त्यातून १०० कॅलरीज मिळतात. शिवाय रताळ्यात बीटा – कॅरोटीन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सुद्धा असतं.
• दररोज एक संत्र किंवा २०० मिली ग्राम संत्र्याचा रस प्यावा. संत्र्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळं पेशीचं पोषण होतं. शिवाय लोह शोषणामध्येही व्हिटॅमिन सी उपयुक्त ठरतं. या खनिजामुळं थकवा कमी होतो आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते.
• आपल्या आहारात वेगेवगळ्या भाज्यांचं सूप सहभागी करणं आवश्यक आहे. दररोज एकदा तरी आहारात सूप असावं. रोज स्नॅक्स खाणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत दररोज दिवसातून दोन वेळ सूप पिणाऱ्या व्यक्ती आपलं वजन लवकर कमी करतात.
• एक कप पालकामध्ये ४० कॅलरीज असतात. मात्र त्यातून दिवसभरात आवश्यकतेच्या २० टक्केच फायबर तुमच्या शरीरात जाईल. त्यामुळं स्नायुंच्या आकुंचनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पालेभाज्या आहारात आवश्यक आहे. पालेभाज्या कॅल्शियमचं चांगलं स्त्रोत आहे.
• ज्यांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे, त्यांनी आहारत संतुलन राखणं अतिशय गरजेचं आहे. आहारात कॅल्शियमसाठी त्यांनी स्किम्ड दूध, सोयाबीनचे आणि चना आणि मूग डाळ, तर मॅग्नेशियमसाठी संपूर्ण धान्य उदा. ज्वारी, बाजरी, गहू, कढी यांचा समावेश करावा. पोटॅशियमसाठी गडद रंगाची फळं भरपूर खा. हे सर्व बल्डप्रेशरला नियंत्रणात ठेवतं. शिवाय जेवणात दररोज ५ ग्राम किंवा त्यापेक्षा जास्त फायबर असल्यास हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लडप्रेशर आणि लठ्ठपणा सारख्या समस्यांमध्ये ३० टक्के कमी होऊ शकते.
• हर्ब्स आणि मसाल्यात लवंगचा वापर करावा. लवंग अँटी ऑक्सिडंटचा सगळ्यात उत्तम स्त्रोत आहे. म्हणून मसाल्यात त्याचा समावेश करावा.
• दालचिनी सुद्धा खूप उपयुक्त असा मसाला आहे. मधुमेहावरील रामबाण उपाय असून रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्याचं काम दालचिनी करते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.