मुंबई : उन्हात फिरल्याने त्वचा काळवंडलीये, सनबर्न झालंय अथवा कोणता कीटक चावलाय तर चिंता करण्याची गरज नाही या सर्व प्रॉब्लेम्सवर एकच पर्याय आहे तो म्हणजे बटाट्याची साले.
सनबर्न झाल्यास बटाट्याची साले फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर सनबर्न झालेल्या ठिकाणी ठेवा. यामुळे त्वचेची जळजळ कमी होईल.
उन्हात फिरल्याने त्वचा काळवंडल्यास बटाटच्याची साल त्वचेवर चोळा. यामुळे काळेपणा कमी होईल.
चेहऱ्यावर बटाट्याची साले चोळल्याने डेड स्किन निघून जाते.
डोळ्यांच्या जवळ सूज आल्यास बटाट्याची साले त्या ठिकाणी ठेवा. यामुळे सूज कमी होईल.
एखादा कीटक चावल्याने खाज येत असेल तर त्या जागी बटाट्याची साले चोळा. दिवसातून तीन-चार वेळा असेल केल्यास आराम पडतो.
खिडक्यांच्या काचा साफ करायच्या असल्यास बटाट्याच्या चकत्या घेऊन फिरवा.