डायबेटीसने सावधान, डाबेटीसचे १० मोठे धोके

डायबेटीस अर्थात मधुमेह झालेल्या लोकांनी आपली पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आपल्या जीवनशैलीत महत्वाचे बदल केले पाहिजेत, असं न केल्यास आपणही डायबेटीसच्या जाळ्यात येऊ शकता. या आजाराचा शरीरावरील अनेक भागांवर होतो.

Updated: Dec 17, 2015, 05:12 PM IST
डायबेटीसने सावधान, डाबेटीसचे १० मोठे धोके title=

नवी दिल्ली : डायबेटीस अर्थात मधुमेह झालेल्या लोकांनी आपली पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आपल्या जीवनशैलीत महत्वाचे बदल केले पाहिजेत, असं न केल्यास आपणही डायबेटीसच्या जाळ्यात येऊ शकता. या आजाराचा शरीरावरील अनेक भागांवर होतो.

डायबेटीस एक मेटाबॉलिक सिंड्रोम आहे. ज्यात अनेक आजाराचं घर आहे, यामुळे शरीराचा प्रत्येक भाग प्रभावित होतो.

हृदय आणि रक्तवहिन्यासंबंधीच्या आजाराचा धोका डायबेटीसने वाढतो, ज्यात कोरोनरी आर्टरी डिसीज, दुखणं, हार्ट अटॅक, स्ट्रोक, धमन्यांचा आजार यांचा समावेश आहे.

यात पायातील रक्त प्रवाह कमी होत जातो, यामुळे पायाशी संबंधित अडचणी सुरू होतात. यामुळे होणाऱ्या फूट अल्सरमुळे पाय कापण्याचा धोका किती तरी पट वाढतो.

टाईप २ टायबेटीसने अल्झायमरचा धोका वाढतो, रक्तात शुगर जेवढी जास्त, अनियंत्रित होईल, अल्झायमरचा धोका तेवढा .
जास्त होणार आहे.

डाबेटीसमुळे किडनी फेल होण्याचा धोका ५० टक्क्यांनी वाढतो.

डायबेटीसमुळे वाढलेलं वाढलेली शूगर लेव्हल, ब्रेनमध्ये ब्लड सप्लाय करणाऱ्या नसांवर परिणाम करत, यामुळे ब्रेनचा काही भाग डॅमेज होऊ शकतो आणि मेमरी लॉस होऊ शकतो.

वाढलेलली शूगर लेव्हल नर्व्हस आणि सर्कुलेटरी सिस्टमला नुकसान पोहोचवते, यामुळे तुमच्या डोळ्यांवर वाईट प.रिणाम होऊ शकतो.

डायबेटीसमुळे तुमच्या दाताना गंभीर नुकसान होऊ शकतं.

डायबेटीसमुळे तुमचं हृदय आणि संबंधित सर्व नसा, ज्या शरीराच्या दुसऱ्या भागात जातात, त्यांची ग्लुकोज लेव्हल वाढते. यामुळे ब्लॉकेजची शक्यता वाढते. यामुळे हार्ट अटॅकची शक्यता वाढते.

डायबेटीस तुमच्या आतड्यांवर वाईट परिणाम करतो.