शरीरासाठी हानिकारक असतात सुगंधित मेणबत्त्या

 बर्थडे पार्टी, ख्रिसमस पार्टी अथवा फॅमिली पार्टीमध्ये हल्ली सुगंधित मेणबत्त्यांचा वापर सर्रासपणे केला जातो. या मेणबत्त्या रोषणाईसोबतच घरही सुगंधित करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का या मेणबत्त्या तुमच्या स्वास्थासाठी किती धोकादायक आहेत.

Updated: May 13, 2016, 03:50 PM IST
शरीरासाठी हानिकारक असतात सुगंधित मेणबत्त्या title=

नवी दिल्ली :  बर्थडे पार्टी, ख्रिसमस पार्टी अथवा फॅमिली पार्टीमध्ये हल्ली सुगंधित मेणबत्त्यांचा वापर सर्रासपणे केला जातो. या मेणबत्त्या रोषणाईसोबतच घरही सुगंधित करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का या मेणबत्त्या तुमच्या स्वास्थासाठी किती धोकादायक आहेत.

या सुगंधित मेणबत्त्यामुळे घरात टॉक्सिक केमिकल पसरते. जे स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे. या मेणबत्त्या सिगारेटइतक्याच टॉक्सिक असतात. मेणबत्त्यातील सुगंधामध्ये असेलले केमिकेल सिगारेटच्या तुलनेत खूप हानिकारक असते. 

मेणबत्त्याच्या पॅराफिन वॅक्समध्ये कमीत कमी २० विषारी पदार्थ असतात. ज्यात टॉक्सिक अॅसिटोन, फिनोल, जाइलिन, क्रेसॉल आणि ब्लोरोबेंजीन सारखे पदार्थ असतात. या केमिकल पदार्थांमुळे कँसर, फुफ्फुसात जळजळ, मेंदूसह शरीरातील अनेक अवयवांसाठी नुकसानकारक ठरु शकतात. तसेच अॅलर्जीही होण्याची शक्यता असते.