नवी दिल्ली : मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या डायबेटीस, संक्रमण, वेदनाशामक तसंच पचन विकार यांची औषधं ५ रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यत स्वस्त होणार आहेत.
औषधांचा दर नियंत्रित करणारी राष्ट्रीय फार्मास्युटिकल किंमत प्राधिकरणानं (एनपीपीए) ३९ फॉर्म्युलेशंसचे दर नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिप्रोफ्लोक्सेसिन हाइड्रोक्लोराइड, सेफोटेक्सिम, पॅरासिटामोल, डॉमपेरिडोन, मेटाफॉर्मिन+ग्लिमपिराइड आणि ऐमोक्सिलीन+पोटॅशियम क्लॅवूलानेट यासारखी औषधं एनपीपीएनं सामिल करून घेतली आहेत. ही औषधं एबॉट, ग्लॅक्सोस्मिथक्लिन, लुपिन, कॅडिला हेल्थकेअर, आईपीसीए आणि सन्स या मार्केटिंग फार्माद्वारा विकली जातात.
या औषधांची मागणी सुमारे १०५४ कोटीत आहे. एनपीपीएनं सुमारे ३५ फॉर्म्युलेशंसचे दर नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ३-४ औषधांच्या दरांवर संशोधन चालू आहे, असं वक्तव्य रसायन आणि खते मंत्रालयातील फार्मास्युटिकल्स विभागातील अधिकाऱ्यानं दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला आवश्यक औषधांचे दर नियंत्रित करण्याऱ्या धोरणाकडे लक्ष द्यायला सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचनेनंतर दुसऱ्याचं दिवशी एनपीपीएनं किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असं बोललं जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.