रागावर नियंत्रण कसे मिळवाल ?

क्रोध ही एक मानवी भावना आहे. मनाविरूद्ध घडणाऱ्या गोष्टींचा माणसाला राग येणे साहजिक आहे. पण जेव्हा हा क्रोध अनावर होतो तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात. साहजिकच या समस्या भावनिक असतात. यामुळे मानसिक आरोग्य बिघडते. मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावरही होतो.

Updated: Aug 12, 2016, 01:30 PM IST
रागावर नियंत्रण कसे मिळवाल ? title=

मुंबई : क्रोध ही एक मानवी भावना आहे. मनाविरूद्ध घडणाऱ्या गोष्टींचा माणसाला राग येणे साहजिक आहे. पण जेव्हा हा क्रोध अनावर होतो तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात. साहजिकच या समस्या भावनिक असतात. यामुळे मानसिक आरोग्य बिघडते. मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावरही होतो.

रागीट व्यक्तींचे समाजात जगणे कठीण होऊन जाते. इतरांच्या बोलण्याचे चुकीचे अर्थ घेतले जातात. त्यांच्या जवळच्या माणसांच्या जगण्यावरही याचा वाईट परिणाम होतो. शिवाय रागामुळे हृदय आणि रक्तदाबाच्या समस्याही निर्माण होतात. यासाठी रागावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे आहे.

असं मिळवा रागावर नियंत्रण...

  1. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी पूर्ण विचार करा.
  2. तुम्हाला राग कशामुळे येतो हे जाणून घ्या. राग येताना तुमचा श्वास आणि हृद्याचे ठोके वाढत असतील तर त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा.
  3. राग येत असेल तेव्हा स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मनातल्या मनात कमीत कमी दहा किंवा गरज असल्यास त्यापेक्षा जास्त अंक मोजा. यामुळे तुम्हाला शांत होण्यासाठी वेळ मिळेल.
  4. शांत झाल्यावर तुमचा राग सकारात्मक पद्धतीने सौम्य भाषेत व्यक्त करा. यामुळे तुम्हाला दुसऱ्यांना न दुखावता व्यक्त होता येईल.
  5. मंद श्वास घ्या. ३ सेकंद श्वास रोखून धरा. १ ते ३ अंक मोजा आणि हळूहळू श्वास सोडा. पुन्हा १ ते ३ अंक मोजा. राग आला की ही क्रिया ३ ते ४ वेळा करा.
  6. रात्री पुरेशी झोप घ्या. यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि राग नियंत्रणात येईल. अति झोपल्याने आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे जास्त वेळ झोपणे टाळा.