www.24taas.com, वॉशिंग्टन/b>
धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांना अग्नाशय कँसर होण्याचा धोका अधिक असतो. एका नव्या अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे. मिशिगन हेल्थ सिस्टम विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी यासंदर्भात संशोधन केलंय.
धूम्रपान करणाऱ्यांमध्ये साधारण वयाच्या ६२व्या वर्षी आणि मद्यपान करणाऱ्यांना वयाच्या ६१व्या वर्षी अग्नाशय कँसर होण्याची शक्यता असते. जे लोक मद्यपान वा धूम्रपान करत नाहीत, त्यांना अग्नाशय कँसर झालाच, तर तो वयाच्या ७२ व्य वर्षी होऊ शकतो.
अग्नाशय कँसर झालेल्या ८११ रुग्णांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आलाय. धूम्रपानामुळे अकाली मृत्यू होऊ शकतो. अग्नाशय कँसर लक्षात यायला वेळ लागतो. हा कँसर झालेल्यांचा जीव वाचणं अशक्य असतं. कारण या कँसरचा पत्ता लागेपर्यंत कँसर शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचलेला असतो.