तुमच्या पर्समधील नोटा हाताळताना सावधान, नाहीतर...

नोटा तुमच्या जीवावर बेतू शकतं.

Updated: Feb 6, 2016, 05:22 PM IST
तुमच्या पर्समधील नोटा हाताळताना सावधान, नाहीतर...  title=

नवी दिल्ली : तुमच्या पर्समध्ये किंवा खिशात तुम्ही नेहमी जवळ बाळगणाऱ्या आणि ज्या मिळवण्यासाठी तुम्ही जिवाचं रान करता त्या नोटाचं तुमच्या जिवावर उठल्यात असं कुणी सांगितलं तर.... 

होय, हे खरं आहे. तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये तुम्ही ज्या नोटा बाळगतात त्याच तुम्हाला आजारी पडण्यासाठी मदत करतात. एका सर्व्हेच्या निष्कर्षानुसार, कागदी नोटाचं आजारांचं घर आहेत. 

'द इंडियन एक्सप्रेस'नं दिलेल्या वृत्तानुसार वैज्ञानिकांनी केलेल्या पडताळणीत ही गोष्ट उघड झालीय. तब्बल ७८ आजारांना जन्म देणारे जिवाणू या चाचणीत नोटांवर आढळून आलेत. 

रिपोर्टनुसार, याच नोटांची देवाण-घेवाण सुरू असताना अनेक आजार आणि आजारांना पसरवणाऱ्या बॅक्टेरियांचीही देवाण - घेवाण होते. जिवविज्ञान क्षेत्रात संशोधन करणाऱ्या IGIB नं एका शोधादरम्यान या गोष्टीचा खुलासा केलाय. या नोटांमध्ये १०, २० आणि १०० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. IGIB संस्थेच्या पाच विद्यार्थ्यांनी आपलं हे संशोधन दक्षिण दिल्लीच्या बाजारांत केलंय. 

संशोधनादरम्यान, ७८ प्रकारच्या रोगांचा प्रसार करणारे जिवाणू आणि किटाणूंचे फूट प्रिंट आणि डीएनए या नोटांवर आढळलेत. परंतु, हे जिवाणू लोकांपर्यंत रोग संक्रमित करू शकतात किंवा नाही, यावर मात्र अद्याप संशोधन झालेलं नाही.

नोटांचे इन्फेक्शन टाळण्यासाठी हे करा

१. प्लास्टिक करन्सीचा वापर. अनेक देशांमध्ये अशा प्रकारचे चलन अस्तित्वात आहे.

२. आर्थिक व्यवहारांसाठी क्रेडिट, डेबिट कार्ड आणि इतर 'कॅशलेस' पर्यायांचा वापर केला पाहिजे.

३. नोटा मोजताना त्यांना लाळ लावू नये.

४. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धूतले पाहिजे.

५. नोटा लहान मुलांच्या हातात देऊ नये.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.