डेंग्यू आणि चिकनगुनियापासून बचावासाठी बाबा रामदेवांचा घरगुती उपाय

दिल्लीसह राज्यातही चिकनगुनियाने डोकं वर काढलं

Updated: Sep 20, 2016, 03:18 PM IST
डेंग्यू आणि चिकनगुनियापासून बचावासाठी बाबा रामदेवांचा घरगुती उपाय title=

मुंबई : दिल्लीसह राज्यातही चिकनगुनियाचं थैमान सुरु झालंय. डेंग्यूने देखील अनेक भागात डोकं वर काढलं आहे. योग गुरु बाबा रामदेव यांचं म्हणणं आहे की, चिकनगुनिया झाल्यास तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. यासाठी प्रिवेंटिव उपाय केले पाहिजे. ज्यामुळे तुम्ही या आजारांपासून लांब राहू शकता.

बाबा रामदेव यांच्यामते चिकनगुनिया त्या लोकांना होतो ज्यांचं इम्यूनिटी सिस्टम कमजोर असतं. या आजारामुळे ब्लड प्रेशर कमी होणे, प्लेटलेटची संख्या घटने, लीव्हर वीक होने या सारख्या समस्या उद्भवतात. या आजारांपासून बचाव होण्यासाठी डाळिंब, पपईचे पाने, कोरफड याचं सेवन करा.

डेंग्यू आणि चिकनगुनिया एकच डास चावल्यामुळे होतो. हा डास फक्त चांगल्या पाण्यावरच येतात. यामुळे कोठेही पाणी जमा नका होऊ देऊ. बाबा रामदेव म्हणतात की, डेंग्यू आणि चिकनगुनिया हे कमजोर लोकांनाच होतात. त्यामुळे खाणं चांगलं आणि योग्य असलं पाहिजे.