चेहरा सुंदर आणि उजळून दिसण्यासाठी 5 गोष्टी

चेहरा उजळवण्यासाठी या 5 गोष्टी करा. याचे तुमच्या चेहऱ्याला होतील अनेक फायदे.

Updated: Dec 13, 2015, 10:55 PM IST
चेहरा सुंदर आणि उजळून दिसण्यासाठी 5 गोष्टी title=

मुंबई : चेहरा उजळवण्यासाठी या 5 गोष्टी करा. याचे तुमच्या चेहऱ्याला होतील अनेक फायदे.

१. मसूरची डाळ बारीक वाटून ती दुधात घुसळून घ्यावी आणि त्याचा लेप तयार करून चेहऱ्यावर लावावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. आठवडाभर हा उपाय सकाळी आणि संध्याकाळी करावा. 

२. एक कप दूध चांगले आटवून घ्यावे. त्यामध्ये एक लिंबू पिळून दूध थंड करावे. रात्री झोपताना याला चेहऱ्यावर लावून चेहऱ्याची मालिश करावी. रात्रभर ते तसेस ठेवावे. सकाळी उठल्यावर धुवावे.

३. संत्र्याची साले 100 ग्रॅम घेऊन ती वाळवून त्याचे चूर्ण तयार करावे. यात 100 ग्रॅम बाजरीचे पीठ आणि 12 ग्रॅम हळद मिसळून पाण्यात भिजवून चेहऱ्यावर त्याचा लेप लावावा. स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.

४. गाजराचा रस, टोमॅटोचा रस, बीटचा रस 35-25 ग्रॅम दररोज दोन महिने पर्यंत प्याल्याने चेहऱ्यावरची मुरूमे, डाग, सुरकुत्या गायब होतात.

५. लिंबाचा रस गाळून दोन तोळे गुलाब अर्क, 2 तोळे ग्लिसरीन मिसळून एका बाटलीत भरून ठेवावे. रात्री झोपताना चेहऱ्यावर त्याने मालिश करावी. 20 दिवस असे केल्यास त्वचा मऊ होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.