मुंबई : लग्नानंतरही पुरुषांचे विवाहबाह्य संबंध असल्याची प्रकरणे अनेकदा तुम्ही ऐकली अथवा पाहिली असतील. असे संबंध असण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अशा संबंधांमुळे पती-पत्नीच्या नातेसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यामागे काय कारण असू शकते हे जाणून घेणे आवश्यक असते.
अनेकदा वैवाहिक जीवनात कलह पतीच्या विवाहबाह्य संबंधास कारणीभूत ठरतात. ही आहेत चार कारणे ज्यामुळे लग्नानंतरही पुरुषांची एक्स्ट्रा-मॅरिटल अफेयर्स असू शकतात.
कमी वयात लग्न - कुटुंब तसेच समाजाच्या दबावामुळे अनेकदा काहींची लग्ने लवकर होतात. नोकरी लागल्यानंतर लगेचच लग्न होते. लग्नामुळे साहजिकच जबाबदारी येते. लग्न लवकर झाल्याने आपण जीवनात खूप काही मिस केलंय अस त्यांना वाटू लागते. यामुळे पुरुष परस्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवतात.
अनेकदा वैवाहिक जीवनात सेक्शुअल सॅटिसफॅक्शन मिळत नसेल तर जोडीदार परपुरुष अथवा परस्त्रीकडे आकर्षित होतो.,
वैवाहिक कलह - रोजच्या वैवाहिक कलहाला कंटाळून अनेकदा पुरुष परस्त्रीशी विवाहबाह्य संबंध ठेवतात.
पत्नीने वेळ कमी देणे - लग्नानंतर साहजिकच स्त्रियांवर जबाबदाऱ्या वाढतात. त्यात मुले झाल्यास नवऱ्याला वेळ देणे बायकोला जमत नाही. या कारणामुळेही पुरुष परस्त्रीकडे आकर्षित होतात.