मुंबई : लग्न म्हटलं की प्रत्येक मुला-मुलीसाठी एक वेगळी फिलींग असते. प्रत्येकाला वाटतं की त्यांचा लाईफ पार्टनर कसा असेल. लग्नानंतर काय होणार ? त्यानंतर सगळ्यात जास्त विचार होतो तो पहिल्या रात्रीचा. ज्याला गोल्डन नाईट देखील म्हणतात. पहिल्या रात्रीसाठी या १० महत्त्वाच्या गोष्टी.
१. लग्नाच्या पहिल्या रात्री पुरुष शारीरिक संबंधामुळे खूप चिंतीत असतात. आपल्या पार्टनरला ते आनंद देऊ शकतील की नाही याची चिंता त्यांना अधिक असते.
२. पहिल्या रात्री चिंतीत असू नये. दोघांनी ही एकत्र निर्णय घ्यावा. सामान्य व्यवहार ठेवावा. जे तुमच्या मध्ये होणार आहे ते स्विकारावं.
३. शारीरिक संबंध ठेवण्याआधी तुमच्या जोडीदारासोबत बोला. तुमच्या साऱ्या शंका दूर विचारुन घ्या. कोणत्याही प्रकारची घाई करू नका.
४. पहिल्याच दिवशी सेक्स केलं पाहिजे असं नाही. तुमच्या भविष्याबद्दल तुमच्या जोडीदाराशी चर्चा करा. सुरुवात चांगली असेल तर पूर्ण जीवन व्यवस्थित राहील.
५. खोलीत जाताच शारीरिक संबंध बनवण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे तुमच्या पार्टनरला असहज होऊ शकतं. ज्यामुळे ती तुम्हाला हवी तसं रेस्पॉन्स देऊ शकणार नाही.
६. पहिल्या रात्री तुमच्या पार्टनरला काही तरी सरप्राईज द्या. ड्रेस, बाहेर जाण्याची तिकिटं किंवा इतर गोष्टी तुम्ही भेट देऊ शकता.
७. पहिल्याच रात्री शारीरिक संबंध ठेवणं जर तुम्हाला योग्य वाटत नसलं तर तुमच्या पार्टनरला त्याबाबत सांगा. यामुळे नकारात्मकता उभी राहणार नाही.
८. महिलांना दागिने खूप आवडतातत. त्यामुळे पहिल्या रात्री तुम्ही त्यांना दागिने देऊन खूश करु शकता.
९. शारीरिक संबंध सुरु करतांना फोरप्ले करा. ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला ते उत्तेजित करेल आणि तुम्ही आनंद घेऊ शकाल.
१०. शारीरिक संबंध करतांना कोणतेही माहित नसलेले प्रयोग करु नका. यामुळे तुमच्या रोमँटीक लाईफवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणतेही वेगळे आसण वापरू नका.