www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (यूपीए) सरकारवर दणकून तोंडघशी पडायची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पराजयाचं विश्लेषण केलंय. विविध घोटाळ्यांमुळे निवडणुकीत यूपीएला पराभवाचा सामना करावा लागला, असं मत शरद पवार यांनी नोंदवलंय.
जनतेला निगडीत योजना योग्य पद्धतीनं लागू करण्यास आलेलं अपयश हेदेखील या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं आणखी एक महत्त्वाचं कारण असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलंय.
शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रातील यूपीए-2 सरकारमध्ये सहभागी झाला होता. राष्ट्रवादीलाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा अपयशाला सामोरं जावं लागलंय. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ सहा जागांवर समाधान मानावं लागलंय. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्यात. काँग्रेस पक्षला देशभरात 44 जागांवर विजय मिळवता आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.