मोदींचे जोरदार स्वागत, सरकार स्थापनेसाठी वेग

लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व आणि ऐतिहासिक यशानंतर आता केंद्रात नव्या सरकार स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आलाय. आज दिल्लीत भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते, मात्र तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 17, 2014, 03:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व आणि ऐतिहासिक यशानंतर आता केंद्रात नव्या सरकारस्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आलाय. आज दिल्लीत भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते, मात्र तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.
विजय मिळविल्यानंतर मोदी आज सकाळी दिल्लीत आले. पक्षाच्या बैठकीनंतर राजनाथसिंह यांच्यासह मोदी, लालकृष्ण अडवानी, सुषमा स्वराज आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. मोदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी लालकृष्ण अडवानी यांनी मोदींचे स्वागत केले. त्यावेळी मोदी यांनी अडवाणी यांचे आर्शीवाद घेतले त्यानंतर दोघांनी गळाभेट घेतली. पराभूत झालेल्या अरुण जेटली यांनीही मोदींचे स्वागत केले.
नरेंद्र मोदींनंतर त्यांचा गुजरातमधील उत्तराधीकारी कोण असेल, संसदीय पक्ष आणि त्यानंतर आघाडीच्या संसदीय पक्षांची बैठक आणि त्यांच्या तारखा असे अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता होती. दुपारी साडेबारा नंतर ही बैठक बोलावण्यात आली होती. स्वबळावरही सत्ता स्थापन करण्याइतके संख्याबळ मिळविल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संसदीय समितीची बैठक येत्या मंगळवारी होणार असून त्याच बैठकीत नरेंद्र मोदी यांची अधिकृतरित्या पंतप्रधानपदी निवड केली जाईल, असे पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी आज स्पष्ट केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.