बंगालमध्ये तुफान मतदान, महाराष्ट्रात उदासिनता

सोळाव्या लोकसभेसाठी आज राज्यातील तिसरा तर देशातील सहाव्या टप्प्यासाठी मतदान होतंय. यात 11 राज्य आणि एक केंद्र शासिक प्रदेशातील 117 जागांचा समावेश आहे.

Updated: Apr 24, 2014, 09:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोळाव्या लोकसभेसाठी आज राज्यातील तिसरा तर देशातील सहाव्या टप्प्यासाठी मतदान होतंय. यात 11 राज्य आणि एक केंद्र शासिक प्रदेशातील 117 जागांचा समावेश आहे.
यात तामिळनाडूच्या 39, महाराष्ट्राच्या 19, उत्तर प्रदेशच्या 12, मध्य प्रदेशातील 10, बिहार आणि छत्तीसगडच्या सात आणि आसाम तसेच पश्चिम बंगालच्या सहा-सहा तसेच राजस्थानच्या पाच, झारखंडच्या चार तसेच पदुच्चेरी आणि जम्मू-काश्मिरच्या एक-एक लोकसभा सीटसाठी आज मतदान होतंय. याच टप्प्यात मध्यप्रदेश आणि तामिळनाडूत प्रत्येकी एका जागेवर मतदान होतंय.
देशभरातील टक्केवारी, दुपारी 6 पर्यंत
> बिहार - ६० टक्के (रांगा असल्याने वाढण्याची शक्यता)
> झारखंड - ६३.४ टक्के
> आसाम - ७७.०५ टक्के
> पश्चिम बंगाल - ८२ टक्के
> उत्तर प्रदेश - ५८.५ टक्के ( १२ टक्के वाढ)
> मध्य प्रदेश - ६४.०४ टक्के (११ टक्के वाढ)
> राजस्थान - ५९.२ टक्के (१० टक्के वाढ)
> छत्तीसगड - ६२.५ टक्के
> तामिळनाडू - ७३ टक्के
> पुद्दुचेरी - ८२ टक्के
> महाराष्ट्र - ५५.३३ टक्के
सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची स्थिती
देशात लोकसभा निवडणूक २०१४ साठी मतदानाचा सहाव्वा तर महाराष्ट्रात तिसऱ्या टप्पा पार पडला. आज मतदान हे आपलं कर्तव्य आहे, अशाच विचारात बंगालचे नागरिक रस्त्यावर उतरताना दिसले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त म्हणजे सरासरी ७९ टक्के मतदान नोंदवलं गेलं. तर देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत सर्वात कमी म्हणजेच अंदाजे ४५-५० टक्के मतदान नोंदवलं गेलंय. त्यामुळे, अनेकदा कठिण प्रसंगी दिसून आलेलं मुंबईकरांचं 'ते' स्पिरीट आज कुठे गेलं? असा प्रश्न अनेकांना पडल्यावाचून राहिला नाही.
आज मतदान झालेल्या बंगालच्या विविध मतदारसंघांवर एक नजर टाकुयात... (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
* रायगंज - ७९.७८%
* जांगिपूर - ७९%
* मुर्शिदाबाद - ८२.२४%
* मालदा उत्तर - ८०.६७%
* मालदा दक्षिण - ८०.१६%
* बालुरघाट - ८२.८४%

देशभरातील टक्केवारी, दुपारी 3 पर्यंत
दुपारी 3 पर्यंत तमिळनाडूत 60.52%, पश्चिम बंगालमध्ये 60%, मध्य प्रदेशमध्ये 45%, छत्तीसगडमध्ये 54%, पुडुचेरीत 67% आणि आसाममध्ये 55% मतदानाची नोंद करण्यात आली आहे.
दुपारी 2 पर्यंत मध्यप्रदेशात 42.29 टक्के मतदान झाले.

मुंबईच्या मतदानाचा टक्का थोडाफार वाढणार
मुंबईच्या मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीत 44 टक्के होती, हा आकडा 50 च्या आसपास जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईत 60 च्या दशकात सर्वाधिक 68 टक्के मतदान झालं होतं, तो रेकॉर्ड यावेळी तुटेल, असं वाटत होतं, मात्र त्यावरही पाणी फिरणार असल्याचं चित्र सध्या आहे.
मुंबईपेक्षा दक्षिणेतील चेन्नईचा आकडा वाढला आहे. राज्यातही मतदानाच्या टक्केवारीत फार मोठी वाढ झालेली दिसत नाहीय. पश्चिम बंगालमध्ये यावर्षीही विक्रमी मतदान होणार असं चित्र आहे.
आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या नंदुरबार मतदार संघात यावेळी मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाल्याचं दिसून येतंय.
आसाममध्ये पोलिसाचा मृत्यू
आसामच्या कोकराझारमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांच्या संरक्षणार्थ बीएसएफच्या जवानांकडून गोळीबार, एका पोलिसाचा मृत्यू
निवडणूक कर्मचारीचा मृत्यू
ठाण्यात निवडणूक कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या शिक्षिका वैशाली भाले यांचा मृत्यू झाला आहे.
खोपट मतदान केंद्रावरील ही घटना आहे. वैशाली भाले यांना चक्कर येत होती, यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय.

देशभरातील टक्केवारी, दुपारी 1 पर्यंत
दुपारी 1 पर्यंत - झारखंड 43 टक्के मतदान
दुपारी 1 पर्यंत - उत्तर प्रदेश 36.62 टक्के मतदान
दुपारी 1 पर्यंत - मुंबई 23 टक्के मतदान
दुपारी 1 पर्यंत - पश्चिम बंगाल 60 टक्के मतदान
दुपारी 1 पर्यंत - बिहार 37 टक्के मतदान
दुपारी 1 पर्यंत - मध्य प्रदेश 37 टक्के मतदान
UPDATES, सकाळी 11 पर्यंत
दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतचं मतदान
पश्चिम बंगाल : 28 टक्के, दुपारी 12 पर्यंत
बिहार : 15 टक्के, दुपारी 11 पर्यंत
मध्यप्रदेश : 14 सकाळी 8 पर्यंत
पॉड