`स्पायडरमॅन` लढवतोय निवडणूक...

दक्षिण मुंबईत राहणा-या मतदारांच्या घरात प्रचारासाठी एखादा उमेदवार विंडोमधून आत शिरला, तर आश्चर्य वाटून घेऊ नका... कारण

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 4, 2014, 07:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दक्षिण मुंबईत राहणा-या मतदारांच्या घरात प्रचारासाठी एखादा उमेदवार विंडोमधून आत शिरला, तर आश्चर्य वाटून घेऊ नका... कारण बच्चे कंपनीच्या कॉमिक बुकमध्ये दिसणारा, आणि हॉलिवूडपटांचा पडदा गाजवणारा `स्पायडरमॅन` यंदा चक्क लोकसभा निवडणूक लढवतोय.
निवडणूक म्हटली की, हौशे नवशे गवशे उमेदवारांची जंत्रीच असते. त्यात यावेळी भर पडलीय ती स्पायडरमॅनची... एरव्ही उंचच उंच टॉवर्सवर लगबगीने चढणारा स्पायडरमॅन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज ओल्ड कस्टम हाऊससमोर अवतरला, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
गौरव शर्मा नावाचा हा स्पायडरमॅन यंदा दक्षिण मुंबईतून आपलं नशीब आजमावतोय. इतर उमेदवार `डोअर टू डोअर` प्रचारावर भर देतात. मात्र, निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेला हा `स्पायडरमॅन` चक्क `विंडो टू विंडो` प्रचार करणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.