www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
महिला पाळत प्रकरणात नवीन सरकार आल्यावर चौकशीसाठी न्यायमूर्तीची नियुक्ती करेल अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलीय.
महिला हेरगिरी करणे आणि नरेंद्र मोदी यावरून हे प्रकरण खूपचं चर्चेत आलं होतं. त्यातचं काही दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि विधी मंत्री कपील सिब्बल यांनी या प्रकरणाची चौकशीसाठी यूपीए 2च्या कार्यकाल संपण्यापूर्वीचं न्यायमूर्तीची नियुक्ती केली जाईल, असे संकेत दिले होते.
यावर यूपीए दोनचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि नँशनल काँन्फरन्स यांनी यूपीएच्या विरोध भूमिका घेत विरोध दर्शविला होता. आज केंद्र सरकारनं या प्रकरणावर पडदा टाकत न्यायमूर्तीची नियुक्ती नवीन सरकार आल्यावरच करण्यात येईल असं पीटीआयनं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.