बीड जिल्ह्यातील आंधळेवाडीत फेरमतदानाला निवडणूक आयोगाने होकार दिला आहे.
www.24taas.com, झी मीडिया, बीड
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आंधळेवाडीत भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्र ताब्यात घेतल्याचा आरोप होतोय.
या आरोपानंतर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे फेरमतदानाची मागणी केली आणि निवडणूक आयोगानेही ही मागणी मंजूर केली आहे.
आंधळेवाडीत येत्या 24 एप्रिलला फेरमतदान होणार आहे. बीड मतदार संघासाठी यापूर्वी 17 एप्रिल रोजी मतदान झालं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.