राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे लागली कामाला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः विधनसभा निवडणूक लढण्याची तसंच माहाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची भूमिका व्यक्त केल्यानं पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. राज ठाकरे यांच्या संकल्पनेतली सत्ता महाराष्ट्रात आणण्यासाठी तसंच या सत्तेचे प्रमुख बनवण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला सुरूवात केलीये.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 10, 2014, 07:59 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः विधनसभा निवडणूक लढण्याची तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची भूमिका व्यक्त केल्यानं पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. राज ठाकरे यांच्या संकल्पनेतली सत्ता महाराष्ट्रात आणण्यासाठी तसंच या सत्तेचे प्रमुख बनवण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला सुरूवात केलीये.
त्या निमित्तानं मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यांचं आयोजन सुरू झालंय. मनसेचे उपाध्यक्ष नयन कदम यांनी बोरिवली विधानसभा मतदानसंघात रविवारी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं तसंच मनसेचं सरकार येण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतदारसंघात नेमकं काय केलं पाहीजे याच्या सूचना त्यांना या मेळाव्यात देण्यात आल्या. लोकसभा निवडणूकीच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी पदाधिका-यांनी मेहनंत घ्यायला सुरूवात केलीये.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. इंडियन मर्चंट चेंबर्सच्या कार्यक्रमात उद्योजकांसमोर बोलताना त्यांनी हे संकेत दिलेत. मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा मला आनंद देऊन गेल्या, मी लढणार आणि सरकार बनवणार. हे माझं नाही तर आपलं सरकार असेल, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.