प्रिया दत्त यांच्याविरोधात पूनम महाजन

भाजपकडून पूनम महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून हे तिकीट देण्यात आलंय

Updated: Mar 13, 2014, 07:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपकडून पूनम महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून हे तिकीट देण्यात आलंय, त्यामुळं या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्याविरोधात पूनम यांचा मुकाबला होणार आहे.

महेश जेठमलानी यांना मागील वेळेस या मतदारसंघातून तिकीट मिळालं होतं. मात्र आता इथून भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या कन्येला संधी मिळणार आहे.

पूनम महाजन यांनी यापूर्वी विधानसभा लढवली आहे. पूनम यांच्यासाठी ही लोकसभेची पहिली निवडणूक आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.