www.24taas.com, मुंबई
निवडणूक काळात अपहरणासारख्या घटना होत असतात. पण त्याकरिता संपूर्ण शहराला वेठीस धरु नये अशी प्रतिक्रिया गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केली आहे. ठाण्यात सुहासिनी लोखंडे यांच्या अपहरणाच्या घटनेवर आर. आर. पाटील यांनी हे असं बेजबाबदार वक्तव्य केल्याने त्याचं गृहखातं किती कुचकामी आहे दिसून येतं
तसंच रविवारी ठाण्यात अपहरणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई देखील वसूल केली जाईल असंही गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.
पण गृहमंत्र्यांनी अशा बेजबाबदारपणे केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. २६/११ च्या हल्ल्यानंतर देखील असचं बेजबाबदार वक्तव्य केल्याने त्यांना आपलं गृहमंत्रीपद गमवावं लागलं होतं.