झेडपी मतदानासाठी उद्या सुट्टी...

जिल्हा परिषद निवडणूक उद्या ७ फेब्रुवारी २०१२ला घेण्यात येणार आहे. महानगरपालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणजेच जिल्हा परिषद निवडणूक म्हणून त्याकडे पाहिले जाते आहे.

Updated: Feb 6, 2012, 05:04 PM IST

www.24taas.com

 

जिल्हा परिषद निवडणूक उद्या ७ फेब्रुवारी २०१२ला घेण्यात येणार आहे. महानगरपालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणजेच जिल्हा परिषद निवडणूक म्हणून त्याकडे पाहिले जाते आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूक ७ तारखेला होणार असल्याने उद्या २७ जिल्ह्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

जिल्हा परिषद निवडणूकीसाठी मतदान करता यावं यासाठी उद्या २७ जिल्ह्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निव़डणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.

 

निवडणूक आयोगाने याआधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी जाहीर करण्यात आली होती. मात्र काही पक्षाने यावर आक्षेप नोंदवला. जिल्हा परिषदेच्या मतमोजणी निकालाचा परिणाम महानगरपालिका निवडणुकीवर होण्याची शक्यता असल्याचे पक्षांनी सांगितले. पण त्यानंतर मात्र निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या मशीनचं कारण देऊन निकाल महापालिका निकालाच्याच दिवशी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले.