www.24taas.com, झी मीडिया, नवी दिली
पेडन्यूज प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस जारी केलीय. त्यानुसार येत्या 23 मे रोजी दिल्लीत सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
पेडन्यूज प्रकरणी कारवाई करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत, असा निर्वाळा अलिकडेच सुप्रीम कोर्टानं दिला होता. त्यानुसार निवडणूक आयोगानं अशोक चव्हाणांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावलीय.
तसंच झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनाही 23 तारखेला हजर राहण्याचे आदेश आयोगानं दिलेत. कोडा यांनी निवडणूक खर्चाचा चुकीचा तपशिल दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.