www.24taas.com, झी मीडिया, नवी दिली
एक्झिट पोलचा निष्कर्ष काही असला, तरी यावेळी संसदेत त्रिशंकू स्थिती असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतंय. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येणार असला, तरी NDAला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज NCP प्रवक्ते नवाब मलिक यांनी वर्तवलाय.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतदानाची नोंद झालीय. यंदा 9 टप्प्यांमध्ये एकत्रितपणे सुमारे 66.38 टक्के मतदानाची नोंद झालीय. हा आतापर्यंतचा मतदानाचा मोठा विक्रम आहे. यापूर्वी 1984 मध्ये 64.01 टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली होती. तर 2009 मध्ये देशभरात 58.19 टक्के मतदान झालं होतं. गेल्यावेळच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी 8 ने वाढलीय.
तर मुंबईत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुती जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे. गुप्तचर खात्यानं दिलेल्या अहवालानुसार सहापैकी पाच जागा महायुतीला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. सूत्रांनी ही माहिती दिलीय. दक्षिण मुंबईतले काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा वगळता आघाडीच्या इतर उमेदवारांचा पराभव होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. उत्तर मध्यमधल्या भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांचाही विजय होणार असल्याचं या अहवालात म्हटलंय.
देशात काल शेवटच्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलच्या निष्कर्षांनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार, असंच चित्र दिसतंय. मात्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण असा प्रश्न उपस्थित होतो.त्या रेसमध्ये महसूल मंत्री आनंदीबेन मेहता आणि नितीनभाई पटेल आघाडीवर आहे. यासाठी बैठकीत शिक्कामोर्तब झाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.