सुपरस्टार रजनीकांत आणि नरेंद्र मोदींची आज भेट?

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आद सुपरस्टार रजनीकांत यांची चेन्नईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता आहे. ही खाजगी भेट असल्याचं बोललं जातंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 13, 2014, 11:17 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आद सुपरस्टार रजनीकांत यांची चेन्नईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता आहे. ही खाजगी भेट असल्याचं बोललं जातंय.
भाजपचे तामिळनाडूचे प्रभारी पी. मुरलीधर राव यांनी ट्विटरवर लिहिलंय, "नरेंद्र मोदी अभिनेते रजनीकांत यांच्या निवासस्थानी चेन्नईत त्यांची भेट घेणार आहेत." भाजपतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी आज चेन्नईत प्रचारसभेला येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रजनीकांत सोबत खाजगी भेट घेणाण्यासाठी त्यांच्या घरी जातील.
लोकसभा निवडणुकीवर याचा परिणाम होईल का? असा प्रश्न विचारला तेव्हा सुत्रांनी सांगितलं की, ही एक खाजगी भेट आहे. मात्र नरेंद्र मोदी आणि निवडणूक हे वेगळी करता येवू शकत नाही. यापूर्वी भाजपच्या नेत्यांची अशी आशा होती की निवडणुकीत रजनीकांत यांचा पक्षाला फायदा होईल.
तामिळनाडूच्या राजकारणात भाजपचा नाममात्र आधार आहे. मात्र स्थानिक पक्षांसोबत युतीकेल्यानंतर यावेळी तिथं चांगलं काम आपण करू, असा विश्वास भाजपला आहे.
रजनीकांत यांचे फॅन्स त्यांना राजकीय पक्ष काढण्याची मागणी करत असल्याचं समजलं. मात्र रजनीकांत हे चित्रपटांवरच आपलं लक्ष केंद्रीत करून आहे. २००४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान रजनीकांत यांनी भाजपला मत द्या, असं आवाहन केलं होतं. मात्र तरीही रजनीकांत पक्षात आले नाही. रजनीकांत यांनी भाजपला मत देण्याचं आवाहन केल्यानंतरही तामिळनाडूत एकही जागा भाजपला जिंकता आली नाही. २००९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपनं रजनीकांत यांचं समर्थन मिळविण्याचे खूप प्रयत्न केले. २००८मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रजनीकांत यांची भेट घेतली होती, पण ते त्यांचं मन जिंकू शकले नाही.
आता रजनीकांत भाजपसोबत येण्यास इच्छुक दिसत नाही. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदींसोबतची त्यांची मैत्रीपूर्ण भेट नवी आशा निर्माण करू शकते. गेल्याच महिन्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी किंवा आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यापैकी तुम्ही कोणाला पाठिंबा देणार? हा प्रश्न रजनीकांत यांना विचारला असता, त्यांनी `नो पॉलिटिक्स` हे उत्तर दिलं होतं. ९ मे रोजी रजनीकांत यांचा `कोचादेयान` हा चित्रपटही रिलीज होतोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.