www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे आज सायंकाळी शपथ घेणार आहे. पण त्यापूर्वी दिल्लीतील गुजरात भवन येथे भाजप नेत्यांच्या भविष्यातील कॅबिनेट संदर्भात तणावात बैठक झाली.
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची एक यादी आज सकाळी राष्ट्रपती भवनाला पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत. निवडणुकीपूर्वी सर्व पक्षांची मोट बांधण्यात यश मिळविलेल्या भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांना गृहमंत्रालयची जबाबदारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण देशांतर्गत सुरक्षा ही गृहमंत्रालयाकडून काढून घेऊन ती पंतप्रधान कार्यालयाकडे देण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.
निवडणूक प्रचाराच्या वेळी लष्कराला अत्याधुनिक हत्यार देण्याचे मोदी यांनी सांगितले होते. त्यामुळे संरक्षण मंत्रालय ते स्वतःजवळ ठेवतील अशीही चर्चा आहे.
एका वृत्तानुसार २४ कॅबिनेट मंत्री, ११ राज्य मंत्री आणि १० स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांना शपथ देण्यात येणार आहे.
कॅबिनेट मंत्र्यांची यादी
राजनाथ सिंग, अरूण जेटली, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, वैकंय्या नायडू, सदानंद गौडा, उमा भारती, नजमा हेप्तुल्ला, गोपीनाथ मुंडे, रामविलास पासवान, कलराज मिश्रा, मनेका गांधी, अनंत कुमार, रवी शंकर प्रसाद, अशोक गजापती राजू, अनंत गीते, हरसिमरत कौर बादल, नरेंद्र सिंग तोमर, जुएल ओराम, राधा मोहन सिंग, थावर चंद गेहलोत, स्मृति इराणी, डॉ. हर्षवर्धन
१० स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री
जनरल व्ही.के. सिंग, राव इंद्रजीत सिंग, संतोष कुमार गंगवार, श्रीपाद नाईक, धर्मेंद्र प्रधान, सरबनंदा सोनवल, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, डॉ. जितेंद्र सिंग आणि निर्मला सिताराम
राज्यमंत्री
जीएम सिद्धेश्वर, मनोज सिन्हा, उपेंद्र कुशवाह, पोन राधाकृष्णन, किरण रिजीजू, कृष्णन पाल गुज्जर, संजीव बलियान, मनसुखभाई धनजीभाई वसावा, रावसाहेब दानवे, विष्णू देव साहय आणि सुदर्शन भगत
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.