www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून एक रुपयाही पगार घेत नव्हते. त्यांचा गेल्या १२ वर्षांचा पगार जमा झाला होता. त्यांनी हा पगार आपल्या चालक, रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी भेट दिल्याचा मेसेज सध्या व्हॉट्सअपवर फिरत असून तो धुमाकूळ घालत आहे.
नियमानुसार जो ठरलेला पगार होता, तो मात्र साठतच होता. हा सगळा पगार आणि इतर सगळे भत्ते मिळून सुमारे २१ लक्ष रुपये इतकी रक्कम भरत होती. मोदी आता कायमचे दिल्लीला आले आहेत.
तेव्हा जाता जाता त्यांनी ही सर्व रक्कम त्यांचे चालक, रक्षक इ. कर्मचाऱ्यांसाठी देऊन टाकली. ही सगळी रक्कम खुद्द मोदींच्याच इच्छेने सदर मंडळींच्या मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाणार आहे.
मात्र, हा पहिला मेसेज आल्यानंतर दुसरा मेसेज २ कोटी रुपये जमा झाले असा तयार झाला. त्यामुळे खरी किती रक्कम दिली हे फक्त मोदींनाच माहिती आहे. पण असे झाले असेल तर ते खरंच प्रशंसनीय आहे. मोदींना हा पायंडा पाडून अनेकांच्या सणसणीत कानाखाली दिली असल्याचंही व्हॉट्सअपवर फिरत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.