गुजरातच्या वडोदऱ्यातून मोदींचा अर्ज दाखल

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज वडोदरा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Updated: Apr 9, 2014, 05:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वडोदरा
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज वडोदरा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सयाजीराव गायकवाड यांचा शिक्षणाविषयीचा महान दृष्टीकोन सांगितला.
राज्यकर्त्यांसाठी आजही सयाजीराव गायकवाड यांचे विचार महत्वाचे असल्याचं मोदींनी सांगितलं. वडोदऱ्यात आपल्या जीवनातील महत्वाचे दिवस गेले आहेत, यासाठी वडोदऱ्याच्या लोकांशी आपलं अनोखं नात असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
किरण महिडा नावाचा चहावाला आणि शाही कुटुंबातील सदस्य शुभांगिनी देवी राजे गायकवाड मोदींच्या अर्जावर समर्थक म्हणून सही केली.
उमेदवारी अर्ज भरण्याआधी वडोदरा इथं मोदींचा रोड शो झाला. या रोड शो दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती.
मोदींच्या सांगली आणि लातूरमध्ये सभा होतायत.. या सभांची जय्यत तयारी करण्यात आलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.