बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची शक्यता

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची शक्यता आहे. जर तृणमूल काँग्रेस आणि निवडणूक आयोग यांच्यात या विषयावर सकारात्मक चर्चा झाली नाही, तर निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं सांगण्यात येत आहे.पश्चिम बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची शक्यता

Updated: Apr 8, 2014, 04:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची शक्यता आहे. जर तृणमूल काँग्रेस आणि निवडणूक आयोग यांच्यात या विषयावर सकारात्मक चर्चा झाली नाही, तर निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश न मानल्याने निवडणूक आयोगाला हा गंभीर निर्णय घ्यावा लागणार आहे.पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांची बदली न करण्याचा निर्णय सरकारने न घेतल्याने, राज्यातील निवडणूक तूर्तास रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे,
सध्या ही चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे, मात्र यावर नक्की काही तरी निर्णय होईल, अशी अपेक्षा निवडणूक अधिकाऱ्यांना आहे.
पश्चिम बंगालमध्ये पाच पोलिस अधिक्षक आणि एक जिल्हा मॅजिस्ट्रेटविरोधात तक्रार मिळाल्यानंतर, त्यांना निवडणुकीच्या कामावरून हटवण्यात आलं होतं, यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज झाल्या आणि त्यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय मानण्यास नकार दिला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.