www.24taas.com, झी मीडिया
निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना विरुद्ध मनसे यांचा वाद रंगतोय. या वादात आता शिवसेनेत नव्यानेच प्रवेश केलेल्या अभिनेता डॉ. अमोल कोल्हे याने उडी घेतली आहे. नऊ महिन्यात मूल जन्माला येते. मात्र `त्यांना` सात वर्षात महाराष्टाच्या विकासाची `ब्ल्यू प्रिंट` काढता आली नाही, अशी खोचक टीका डॉ. कोल्हे यांनी राज ठाकरे यांच नाव न घेता केली.
आपण कुठल्या पक्षात जाणार याचा तर्क वितर्क लावत असताना, मी लचके तोडणा-या तरसांच्या कळपात जाण्यापेक्षा, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली म्हणजेच ढाण्यावाघांच्या समुदायात जाणे पसंत केले.
देशात तरुणांची संख्या अधिक आहे. पण तरुणांसाठी काही धोरण नाही. उलट या तरुणांना भडकविण्याचे काम काहीजण करीत असल्याचा आरोप डॉ. अमोल कोल्हे यांनी मनसेचे नाव न घेता केला. देशाला ढाण्या वाघाच्या चालीने स्वतःच्या कर्तुत्वावर पुढे जाणारे नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदी हवेत, असे मत त्यांनी मांडले.
मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी डॉ. कोल्हे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.