www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजप अध्यक्ष राजनाथ सिंहांनी लखनऊमध्ये मतदान केलं. राजनाथ सिंह आणि काँग्रेसच्या रिटा बहुगुणामध्ये बिग फाईट आहे. तर गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणा-या लालकृष्ण अडवाणींनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे.
लखनऊमध्ये काँग्रेसच्या रिटा बहुगुणा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांची लढत भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याशी होणार आहे. यावेळी त्यांनी प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
भाजप नेते अमित शहा यांनी गांधीनगरमधून आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी देशामध्ये परिवर्तनाची लाट आहे. अशी प्रतिक्रिया दिली.
बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उत्तर प्रदेशमध्ये आज लोकसभेच्या 14 जागांसाठी मतदान होतंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बडोद्यातून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे मधुसुदन मिस्त्री यांनी गांधीनगर इथं सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. गांधीनगरमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जम्मू काश्मीरमध्ये एका जागेसाठी मतदान होतंय. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी आपणच जिंकून येऊ असा विश्वास फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केलाय.
आंध्रप्रदेशमधून विभाजित करण्यात आलेल्या तेलंगणासाठी प्रथमच लोकसभा आणि विधानसभा निवडणूका होत आहेत. तेलंगणामध्ये आज लोकसभेसाठी 17 तर विधानसभेसाठी 119 जागांसाठी निवडणूका होत आहेत. काही महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन तेलंगणा या नव्या राज्याची निर्मिती करण्यात आली असून आता 2 जूनला स्वतंत्र तेलंगणा विधानसभा अस्तित्वात येईल.
आंध्र प्रदेशातही आज मतदान होतंय.चिरंजीवी यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय. कुटुंबीयांसह चिरंजीवी यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. मात्र मतदान करताना चिरंजीवी यांनी रांग मोडली. त्यामुळं परदेशातून खास मतदानासाठी आलेल्या नागरिकाचा संताप झाला. त्यानं उघडपणे चिरंजींवीविरोधात आपला राग व्यक्त केलाय.
भारताचा बॅट्समन चेतेश्वर पुजारा यानेदेखील मतदानाचा हक्क बजावलाय. बडोद्याच्या या बॅट्समनने आपल्या पत्नीसह सकाळीच मतदान केंद्रावर येऊन मतदान केल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.