www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आज भाजपची संसदीय बोर्डाने नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणून निवडले. लालकृष्ण अडवाणी यांनी मोदी यांची गळाभेट घेतली. त्यानंतर मोदी भावूक झालेत. त्यानंतर अडवाणी यांची बोलण्याची वेळ आली. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी झालेत. त्यावेळी भावूक होण्याचे कारण सांगितले.
अडवाणी यांनी आपल्या भाषणात जीवनातील काही गोष्टींना उजाळा दिला. काही प्रसंग असे होते की, ते जीवनभर लक्षात राहतात. तर काही प्रसंग आठवतात आणि ते प्रसंग आठविले की हे प्रसंग सांगतात, हे ही प्रसंग आले होते. जसे, नरेंद्र भाई यांनी सांगितले. नितीन गडकरींनी सांगितले की, पहिल्यांदाच संसदेत आलो आहे. हा ही त्यांच्या जीवनातील एेतिहासिक प्रसंग आहे. मात्र, हा पहिला दिवस असला तरी नरेंद्र भाईंना ही संधी पुन्हा पुन्हा मिळेल.
याचा प्रत्यय मला दोन दिवस आधीच आला आहे. याचे फळ हे आज येथे बसल्यानंतर कळतआहे. 1946 मध्ये संविधान सभा झाली. मी काही विसरणार नाही. 1927 मध्ये संसद भवन उभाऱण्यात आले होते. याच साली माझा जन्म झाला. 1947मध्ये भारताला स्वातंत्र मिळाले. त्याआधी मला सारखं वाटत होतं भारत कधी स्वतंत्र होणार? 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. मी त्यावेळी कराचीत होता. माझा स्वभाव लहानपणापासून हळवा होता. आतापर्यंत हा हळवेपणा गेलेला नाही. रीडर्स डाइजेस्टमध्ये मी एक आर्टिकल वाचले. भावनात्मक लोकांवर कोणी टीका केली अथवा त्यांची प्रशंसा केली तरीही त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्यावेळी मी हे आर्टिकल वाचले होते. तेव्हा ही एक भावनात्मक कमजोरी आहे. परंतु मी विचार करत आहे.
1947 पासून ते आज तकच्या प्रसंगाची. स्वतंत्र मिळण्यापासून डोळ्यात अश्रू आले. एक वेळी मला जेलमध्ये जावे लागले. वाजपेयी आणि मी संसदीय समितीच्या बैठकीसाठी बंगळुरला गेलो होतो. तेथे अटक करण्यात आली. त्यावेळी जेलमधून सुटका झाली त्यावेळी डोळ्यात अश्रू होते. आता नरेंद्रभाई भेटले. मी त्यांचे अभिनंदन केले त्यावेळी डोळ्यात अश्रू आलेत. हे सर्व प्रसंग आहेत की, ते नेहमी आठवण देतात. मी राजकारणात आलो त्यामुळे मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. हा एक एेतिहासिक क्षण आहे.
एक दिवशी ऑफिसला जात असताना एका पत्रकारांने विचारेल तुमच्या डोळ्यात अश्रू का येतात. त्यावेळी मी त्याला सांगितले होते, वेळ आली की मी ते सांगेन. हा क्षण नरेंद्र भाई मोदींमुळे मला सांगण्याचा मिळाला. जुन्या आठवणीं मला सांगता आल्यात. नरेंद्र भाई ही मोठी जबाबदारी यशस्वी पार पाडतील. त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांनी शुभेच्छा देता. माझ्या शुभेच्या नरेंद्र भाई स्वीकारतील, असे अडवाणी यांनी यावेळी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.